
Nanasaheb Parulekar Jayanti
Sakal
पुणे : शेततळ्यात पोरं बुडताना दिसताच जिवाची पर्वा न करता थेट तळ्यात उडी मारणारे सूरज मचाले...भररस्त्यात वाहतूक नियंत्रण करताना ‘पीएमपी’ बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता त्याला सीपीआर देणारे आणि वैद्यकीय मदत करणारे पोलिस कर्मचारी रोमेश ढावरे आणि अर्चना निमगिरे....तर आपल्या कुटुंबातील विवाहाचा स्वागत समारंभ तात्पुरता थांबवून दुसऱ्या कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा तितक्याच जल्लोषात करणारे निवृत्त पोलिस निरीक्षक फारुख काझी अशा खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या देवदूतांचा ‘सकाळ’च्या वतीने शनिवारी (ता. २०) सन्मान करण्यात येणार आहे.