

Sakal Tourism Expo
पुणे : पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटनाशी संबंधित विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे 'सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६' आयोजित करण्यात आला आहे. २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन होणार असून, त्यासाठी अधिकृत स्टॉल बुकिंगला सुरुवात झाली आहे. पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा आणि उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.