सर्व प्रकारची घरं सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून मिळतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal vastu expo 2022 buy home Real Estate all type of Properties pune

सर्व प्रकारची घरं सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून मिळतील

पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सकाळ वास्तू एक्स्पोचे आयोजन माऊली मंगल कार्यालय बाणेर या ठिकाणी करण्यात आले आहे.याचे उदघाटन शनिवार (ता.४) जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, लोकमान्य को.आॕपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटी लिमिटेडचे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशिल जाधव,मुख्य व्यवस्थापकीय संचालक, वरद प्रॉपर्टीज महेश कुंटे,सकाळचे संपादक सम्राट फडणीस इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.डॉ. कोलते म्हणले, सर्व प्रकरची, बजेटनुसार घरे नागरिकांना सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून मिळणार आहेत. नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

तसेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ग्रीन हाऊसला महत्त्व दिले आहे.यामधून शहराच्या विकासाला चालना मिळेल.जाधव म्हणाले, सकाळच्या विविध उपक्रमात लोकमान्य सोसायटी भाग घेते.लोकमान्य ग्राहकांकडून ठेवी घेते मात्र आम्ही कर्ज देखील देतो.आमचे ठेवीचे व्याजदरही जास्त आहे.राष्ट्रीयकृत बॅंकेच्या कर्जाच्या व्याज दराप्रमाणे आम्ही गृहकर्ज देतो.सकाळची आम्हाला बाकी ठिकाणी वाढण्यासाठी जी मदत झाली ती मदत याठिकाणी नक्की होईल.सकाळ वास्तू एक्स्पोच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल.

कुंटे म्हणाले, या ठिकाणी फ्लॅट आणि प्लॉट हे दोन्ही पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. ज्यांना घर घ्यायच आहे त्यांना बरेच पर्याय आहेत,तसेच ज्यांना भांडवल गुंतवायचं आहे. त्यांच्यासाठी देखील ही उत्तम संधी आहे. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश दामले यांनी केले.

औंध,बाणेर,बालेवाडी भागातील नागरिकांसाठी प्रथमच सकाळ वास्तू एक्स्पोचे आयोजन करण्यात आले.वीस पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले असून पुणे शहरासह इतर शहरात देखील घर,जागा खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत.सदरील प्रदर्शन रविवार ( ता.५) जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

Web Title: Sakal Vastu Expo 2022 Buy Home Real Estate All Type Of Properties Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top