पुण्यात ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Vastu Expo 2022

आजच्या घडीला घर घेण्यासाठीची तयारी आहे, लोकेशन व प्रकल्पदेखील पाहता आहात; पण त्यासोबत घरकर्जाची तयारी बाकी आहे का, अशा सर्व घरखरेदीदारांसाठीच्या गरजा ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मधून पूर्ण होणार.

पुण्यात ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ उद्यापासून

पुणे - आजच्या घडीला घर घेण्यासाठीची तयारी आहे, लोकेशन व प्रकल्पदेखील पाहता आहात; पण त्यासोबत घरकर्जाची तयारी बाकी आहे का, अशा सर्व घरखरेदीदारांसाठीच्या गरजा ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मधून पूर्ण होणार आहेत. शनिवार (ता. २०) आणि रविवारी (ता. २१) कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन येथे एक्स्पो होणार असून ग्राहकांना घर खरेदीबरोबरच गृह कर्जाविषयीची सर्व माहिती मिळणार आहे. गृह खरेदीची माहिती देण्यासाठी लोकमान्य सोसायटी ही ‘सकाळ एक्स्पो’साठी फायन्सास पार्टनर असेल.

नुकत्याच घेतलेल्या पत धोरण आढाव्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरात वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकांचे घरकर्जाचे व्याजदर देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याआधीच घरकर्जाचा पर्याय निवडून घरखरेदीची प्रक्रिया सोपी करण्याचा ही सुवर्णसंधी आहे. घरखरेदीदारांना ‘वन बीएचके’पासून ते अगदी आरामदायी सदनिकांसह प्लॉट, सेकंड होम आदी घरांसाठीचे पर्याय या एक्स्पोमध्ये मिळतील.

विश्वास व पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आता ग्राहकांसाठी सुलभ कर्ज योजना सादर केली आहे. त्यात होम लोन, मॉर्गेज लोनचा समावेश आहे. या सुविधेमुळे ग्राहक कमीत कमी कागदपत्रांमध्ये, सुलभ रिपेमेंट, कर्जाचा कमी हप्ता सर्व प्रकारची कर्जे लोकमान्य सोसायटीत एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

- सुशील जाधव, पुणे विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

चांगल्या घरांच्या पर्यायांची उपलब्धता आणि विकसकांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती लक्षात घेता सणांच्या पार्श्वभूमीवर असलेला सध्याचा काळ घरखरेदीसाठी सुवर्णसंधी असणार आहे. वेंकटेश बिल्डकॉनच्या प्रकल्पांमधून ५५ ते ६० लाखांपासून सुरू होणाऱ्या घरांच्या किमतीच्या पर्यायांसह ते शहराच्या मध्यवर्ती व प्रतिष्ठेच्या उपनगरांतही आरामदायी व उच्च अभिरुची असणारे घरांचे पर्याय उपलब्ध आहेत.

- अंकुश आसबे, व्यवस्थापकीय संचालक, वेंकटेश बिल्डकॉन

सकाळ वास्तू एक्स्पोमधील आमचा अनुभव खूप छान आहे. ग्राहक आणि विकसकांसाठी दोन्ही अंगाने परिपूर्ण विचार करून सकाळ माध्यम समूह अशा प्रदर्शनाचे आयोजन करतो. त्यामुळे इथे ‘सिरिअस बायर’ येताना दिसतो. घरखरेदीची ही योग्य वेळ आहे. घरांचे सर्व पर्याय एकाच छताखाली सकाळ प्रॉपर्टी एक्स्पोमधून उपलब्ध असतात.

- रुही रायचंदानी, संचालक, रायचंदानी ग्रुप

हे लक्षात ठेवा

कधी : शनिवार, २० व रविवार, २१ ऑगस्ट २०२२

कुठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग मोफत

संपर्क : ९७६४६७२४३१

Web Title: Sakal Vastu Expo 2022 In Pune From Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneSakalvastu tips