
‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आजपासून; घर खरेदीदारांसाठी मोठी संधी
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ची सुरुवात आजपासून बाणेरमध्ये सुरुवात होत आहे. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते व ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (ता. ४) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे.
दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन बाणेर रस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ माऊली गार्डन येथे भरणार आहे. तसेच, एक्स्पोमध्ये इच्छुक खरेदीदारांसाठी घरकर्जाची माहिती व सोय उपलब्ध करून देणारे स्टॉल्सही असतील. हे एक्स्पो वातानुकूलित असून तिथे पार्किंग व प्रवेश मोफत आहे. एक्स्पोच्या माध्यमातून पुणे महानगरातील सर्व उपनगरांमधील गृहप्रकल्पांचे विविध पर्याय फ्लॅट, बंगलो, रोहाऊस, रिडेव्हपलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एन.ए. प्लॉटची माहिती ग्राहकांना इथे मिळणार आहे.
पुणे महानगरातील वीसहून अधिक विकसकांचे ७५हून अधिक प्रकल्पांमधील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील. योग्य किमतीतील, मोठ्या व आरामदायी घरांचे पर्याय या सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून इच्छुक घर खरेदीदारांना निवडता येणार आहेत. ‘लोकमान्य सोसायटी’ या एक्स्पोचे फायनान्स पार्टनर म्हणून सहभागी होत आहेत.
प्रदर्शनाविषयी...
कधी : शनिवार (ता. ४) व रविवारी (ता. ५)
कुठे : बाणेर रस्ता, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, माऊली गार्डन
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग : मोफत
Web Title: Sakal Vastu Expo 2022 Start In Baner Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..