
पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायाची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत.
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ चे पुण्यात आयोजन
पुणे - दहावी-बारावीची (SSC-HSC) परीक्षा (Exam) संपली की वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षणाचे (College Education) आणि करिअरची (Career) नेमकी दिशा ठरविण्याचे. अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते किंवा अनेकदा गोंधळ उडतो. त्यावेळी गरज असते ती ठरविलेल्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्याची, योग्य दिशा देण्याची. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सकाळ माध्यम समूह ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ (Sakal Vidya Education Expo-2022) या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला साथ देणार आहे. हे प्रदर्शन ३ ते ५ जून दरम्यान गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भरविण्यात येणार आहे.
पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायाची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळू शकणार आहे. वेगवेगळ्या विद्याशाखा, अनेक महाविद्यालये, मान्यवर वक्त्यांची मार्गदर्शन, व्याख्याने यांचा समावेश प्रदर्शनात असणार आहे.
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. प्रदर्शनातील स्टॉलद्वारे अनेक क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी या विषयीची माहिती तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे.
येथे करा ‘स्टॉल्स’चे बुकिंग :
शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ या सगळ्यात भव्य अशा शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा, असे वाटतंय का! अहो, मग वाट कशाची पाहात! लगेचच बातमीत खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा आणि तुमचा स्टॉल ‘बुक’ करून ठेवा. चला, तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण आणि करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोचविण्यासाठी तयार व्हा.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५०९७९०९८, ९९२२९१३५१०, ९९२३६४५६७९
Web Title: Sakal Vidya Education Expo 2022 In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..