पुणे - ‘एकेकाळी आपल्याकडे विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेऊन, त्याआधारे संबंधित विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा, हे सांगणारी शिबिॅरे आयोजित केली जात होती. आजही अशा प्रकारची शिबिरे होत आहेत. परंतु, आता विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता काय सांगते, यापेक्षाही अधिक संबंधित विद्यार्थ्याने काय केल्यास; तो भविष्यात यशस्वी होईल, हे कळण्याची आवश्यकता आहे,’ असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.