स्वप्नांच्या पंखांना मिळाले कौशल्याचे बळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal seminar

रविवारच्या सायंकाळी स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंचाच्या सभागृहात शेकडो ध्येयासक्त नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत उत्स्फूर्त हजेरी लावली होती. ‘लॉकडाउन’च्या काळात आर्थिक चिंतेत सापडलेले चेहरे, नव्या उमेदीने नवे काहीतरी करायचे असे ठरवून आलेले चेहरे, नोकरी सोडून आता स्वतःच काहीतरी करायचे, या निर्धाराने आलेले निश्‍चयी चेहरे, अशा असंख्य आशा-आकांक्षांना घेऊन आलेल्या नागरिकांनी हे सभागृह ‘कोरोना’च्या साथीमुळे खबरदारीचे सारे नियम पाळत अर्धे भरले होते.

स्वप्नांच्या पंखांना मिळाले कौशल्याचे बळ!

‘सकाळ विद्या’ आणि ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी’ आयोजित सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे - रविवारच्या सायंकाळी स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंचाच्या सभागृहात शेकडो ध्येयासक्त नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत उत्स्फूर्त हजेरी लावली होती. ‘लॉकडाउन’च्या काळात आर्थिक चिंतेत सापडलेले चेहरे, नव्या उमेदीने नवे काहीतरी करायचे असे ठरवून आलेले चेहरे, नोकरी सोडून आता स्वतःच काहीतरी करायचे, या निर्धाराने आलेले निश्‍चयी चेहरे, अशा असंख्य आशा-आकांक्षांना घेऊन आलेल्या नागरिकांनी हे सभागृह ‘कोरोना’च्या साथीमुळे खबरदारीचे सारे नियम पाळत अर्धे भरले होते. निमित्त होते ‘सकाळ विद्या’ आणि ‘एसपी फायनान्स अकॅडमी आॅफ इंडिया’ आयोजित एका खास सेमिनारचे! 

भांडवली गुंतवणूक न करता अल्पकाळात उत्पन्नाचा हमखास मार्ग दाखविणाऱ्या या विशेष सेमिनारमध्ये प्रसिद्ध प्रशिक्षक व वक्ते T.I.G.E.R संतोष नायर आणि एसपी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांनी मार्गदर्शन केले. सेमिनारला तरूण-तरुणी, गृहिणी, नवउद्योजक, मध्यमवयीन नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठी हजेरी लावली होती. कोरोनाच्या काळात ‘सोशल डिस्टंन्सिंग’चे काटेकोर पालन करीत झालेला हा सर्वांत मोठा कार्यक्रम ठरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणी नवे काही शिकायला आले होते, कुणाला नव्या व्यवसायाच्या संधी जाणून घ्यायची होती, कुणाला स्वतःचे उत्पन्न वाढवायचे होते, तर कुणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. अशा शेकडो स्वप्नांच्या पंखांना या दोन वक्‍त्यांच्या संभाषणातून कौशल्याचे बळ मिळाले. ‘आता काहीतरी करायचेच,’ या निश्चयाने बाहेर पडणारे हे संभाव्य नवउद्योजक स्वतःसोबत नवा बदल घेऊन जात होते. 

पुण्यातील हा वाडा होतोय इतिहासजमा

जीवनात स्वतःचे ध्येय निश्‍चित आणि स्पष्ट असायला हवे, असे सांगताना संतोष नायर म्हणाले, ‘‘कोणतेही यश किंवा ध्येय प्राप्त करण्यासाठी आधी त्यासंबंधीचे ज्ञान प्राप्त करा. त्यातून व्यक्तीचा दृष्टिकोन विकसित होत अंगभूत कौशल्यांचा विकास होतो. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतील. धोरणे निश्‍चित करा आणि यातूनच सृजनशीलता विकसित होते. तुम्ही जे ठरवले आहे, ते पूर्ण करा.’’ एसपी फायनान्स अकॅडमी आॅफ इंडियाच्या ‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ या संकल्पनेचे प्रेरणास्रोत असलेल्या बामगुडे यांनी उपस्थितांना वित्तीय उद्योजकतेचा कानमंत्र दिला. ‘मास्टर सर्टिफिकेशन इन फायनान्स आंत्रप्रेन्युअरशीप’ या अभ्यासक्रमासंबंधी त्यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. 

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने उचलली पावले

सकाळ विद्याच्या या सेमिनारमुळे मला व्यवसायाच्या नव्या संधींबद्दल मूलभूत माहिती मिळाली. एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडियाच्या कोर्सबद्दल अधिक जाणून घेऊन पुढे काय करायचे, हे निश्‍चित करेन.
- सागर तावडे, पुणे

आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग आणि त्यासंबंधीचे मार्गदर्शन शोधण्यासाठी मी या सेमिनारला आलो होतो. पुढील वर्षभरात मला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनायचे आहे. त्यादृष्टीने या सेमिनारचा मला फायदा होणार आहे. 
- शीतल कांबळे, पुणे

एक, दोन, तीन, चार; नो हॉर्न बार बार

धरणग्रस्त असलेल्या वडिलांनी कोरडवाहू शेतीपासून सुरुवात केली. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीत वृत्तपत्र विकण्यापासून विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या. पण प्रत्येक वेळेस नवी संधी शोधली आणि त्यात सातत्य ठेवले. आज आमची कंपनी देशातील अग्रणी कंपनी असून, देशात प्रथमच वित्तीय उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम आम्ही सुरू केला आहे.
- सचिन बामगुडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसपी एंटरप्रायझेस

Edited By - Prashant Patil

loading image
go to top