‘सकाळ इयर बुक’चे लवकरच प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

त्रिपुरा, मेघालय, नागालॅंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या राज्यांमधील विधानसभा निवडणुका, केरळमधील महापूर, शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल, प्लॅस्टिक बंदी, मराठा आरक्षण, विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा, शेतकऱ्यांचा लाँग मार्च, पंतप्रधानांचे विदेश दौरे या घडामोडींमुळे २०१८ हे वर्ष विशेष लक्षात राहिले.

यासह विविध महत्त्वाच्या घडामोडींवर तज्ज्ञ लेखकांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण या पुस्तकात देण्यात आले आहे. व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, जयराम रमेश, शशी थरूर, पी. साईनाथ, शेखर गुप्ता, डॉ. माधव गाडगीळ, योगेंद्र यादव, सुनीता नारायण, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकाश पवार, प्रा. उल्हास बापट आदींच्या लेखांचा यात समावेश आहे. या पुस्तकाची किंमत ३९९ रुपये असून महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या मुख्य आणि विविध आवृत्त्यांच्या कार्यालयांमध्ये हे पुस्तक उपलब्ध होणार आहे.

 अधिक माहिती व नोंदणीसाठी (०२०) २४४०५६७८ या दूरध्वनी किंवा ८८८८८४९०५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधवा. 
  bookganga.com, sakalpublications.com  आणि amazon.in  वर देखील या पुस्तकाची नोंदणी करता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Year Book Publication