Prakash Abitkar : राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानच्‍या कर्मचारी, अधिकारी यांचा पगार लवकरच

औंध येथील राज्‍यस्‍तरीय बालकांच्‍या तपासणी मोहिमेच्‍या कार्यक्रमानंतर कुटुंब कल्‍याण मंत्री प्रकाश आबिटकर पत्रकारांशी बोलत होते.
prakash abitkar
prakash abitkarsakal
Updated on

पुणे - आरोग्‍य विभागाच्‍या अंतर्गत कार्यरत असलेल्‍या असलेल्‍या राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानमधील कर्मचारी, अधिकारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्‍या पथकांचा पगार हा केंद्र शासनाकडून अनुदान यायला उशीर झाल्याने पगार रखडला आहे.

पुढील आठ ते पंधरा दिवसांत ते अनुदान येईल व त्‍यावेळी त्‍यांचा पगार करण्‍यात येईल, असे आश्‍वासन राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

औंध येथील राज्‍यस्‍तरीय बालकांच्‍या तपासणी मोहिमेच्‍या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. १ मार्चपासून दीड ते कोटी बालकांची राज्यस्तरीय आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ शनिवारी औंध येथे झाला. मात्र, ज्‍या बालकांची तपासणी करण्‍याची जबाबदारी आरबीएसकेच्‍या पथकांच्‍या खांद्यावर आहे त्‍यांचा दोन महिन्‍यांपासून पगारच झोला नाही.

याबाबत दैनिक ‘सकाळ’ ने आवाज उठवला होता. गेल्‍या चार महिन्‍यांपासून आरबीएसके च्‍या पथकांचे वेतन अनियमितपणे होत आहे. त्‍याबाबत आरोग्‍यमंत्री आबिटकर म्‍हणाले की, हे सर्व अधिकारी व कर्मचारी हे आरोग्‍य विभागाअंतर्गत काम करत असले तरी त्‍यांचा पगार मात्र केंद्राकडून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने मिळणाऱ्या अनुदानावर होतो.

राज्‍यात ‘आरबीएसके’ चे १२०० पथके कार्यरत आहेत. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत (एनएचएम) राज्‍याच्‍या आरोग्‍य विभागात हजारो डॉक्‍टर व इतर आरोग्‍य कर्मचारी कार्यरत आहेत. त्‍यापैकी आरबीएसके पथक असून त्‍यामध्‍ये एका पथकात महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व परिचारिका यांचा समावेश आहे.

त्‍यांच्‍या वेतनापैकी ६० टक्‍के अनुदान हे केंद्र सरकार तर ४० टक्‍के वेतन हे राज्‍य सरकार देते. बहुतांश वेळेला केंद्राकडून येणाऱ्या अनुदानाला उशीर होतो व त्‍यामुळे त्‍यांच्‍या पगारालाही उशीर होतो. पण ही समस्‍या लवकरच निकाली निघेल. तसेच बर्ड फलू चा महाराष्‍ट्रात मानवी संसर्ग झालेला नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

इव्‍हेंटबाजी नाही

राज्‍यातील मुलांची आरबीएसके च्‍या माध्‍यमातून नियमित तपासणी होत असताना अशा प्रकारचे इव्‍हेंट वर पैसे खर्च करण्‍याचे प्रयोजनाबाबत विचारले असता आबिटकर यांनी पालकांना मुलांच्‍या आरोग्‍य तपासणीबाबत जागरूक करण्‍याचा उद्देश असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

स्‍वच्‍छतेच्‍या कंत्राटाचा पुनर्विचार

आरोग्‍य विभागाने गेल्‍यावर्षी माजी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांच्‍या काळातील स्‍वच्‍छतेचे कंत्राट नाकारले आहे का याबाबत ते म्‍हणाले की, यामध्‍ये राजकीय बेबनाव नसून जर ते कंत्राट नियमबाह्य असेल तर त्‍याची चौकशी करूनच योग्‍य तो निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com