इथं कामगारांची झाली पगारवाढ अन् तेही...

राजकुमार थोरात
Sunday, 7 June 2020

- पेढे वाटून कामगारांनी साजरा केला आनंदोत्सव

वालचंदनगर : राज्यासह संपूर्ण देशापुढे व जगापुढे कोरोनाचे संकट उभे आहे. कोरोनामुळे देश लाॅकडाऊन झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. तर अनेकांच्या वेतनामध्ये कपात झाली आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरमधील वालचंदनगर कंपनीतील कामगारांना ३७५० रुपयांची वेतनवाढ मिळाली असून, कामगारांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कंपनीतील आय.एम.डी कामगार समन्वय संघ व व्यवस्थापन यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासुन वेतनवाढीसंदर्भात बोलणी सुरु होती. मात्र, दोघांच्या आकड्यामध्ये फरक असल्याने करार रखडला होता. लॉकडाऊन होण्यापूर्वी कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. लॉकडाऊननंतर राज्यासह देशामध्ये अनेक कंपन्या सुरु झाल्या असून अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली तर अनेकांच्या पगारामध्ये  कपात करण्यात आली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वालचंदनगर कंपनीही लॉकडाऊननंतर सुरु झाली असून, कंपनीने कामगारांच्या वेतनवाढीच्या करारावर शिक्कामोर्तब केले. शनिवार (ता.६) रोजी वालचंदनगर कंपनीमध्ये वालचंदनगर कंपनी व आय.एम.डी.कामगार समन्वय संघ यांच्यामध्ये वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षरी झाल्या. करारामुळे उत्पादन विभागामध्ये काम करणाऱ्या ७०० कामगारांच्या पगारामध्ये महिन्याला सरासरी ३७५० रुपये वाढ होणार आहे. तसेच कॉमन विभागातील ४२ कामगारांनी २२०० रुपयांची वेतनवाढ झाली आहे. याव्यतिरिक्त उत्पादन विभागातील कामगारांना वाढीव उत्पादनावरती ज्यादा वेतन मिळणार आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवीन वेतनवाढीच्या करारामुळे उत्पादन विभागातील कामगारांना ५६ हजार व काॅमन विभागातील कामगारांना ३६ हजार रुपयांचा फरक मिळणार आहे. वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर कामगारांनी पेढे वाटून आनंदउत्सव साजरा केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर वाल्मिक शुक्ला, धीरज केसकर, आनंद नगरकर, आय.एम.डी.कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, सचिव प्रवीण बल्लाळ, मुरलीधर चिंचकर उपस्थित होते. स्वातंत्रयपूर्व काळापासुन वालचंदनगर कंपनीचा देशउभारणीच्या कामामध्ये मोलाचा सहभाग असून एरोस्पेस,डिफेन्स व न्यूक्लर क्षेत्रामध्ये कंपनीचे भरीव काम आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यमंत्री भरणे यांनी ही केली होती सकारात्मक चर्चा...

वालचंदनगर कंपनीतील आय.एम.डी कामगार समन्वय संघटना व वालचंदनगर कंपनी यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार लवकरात लवकर होण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कामगार युनियन व व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्यवय घडवून आणून वेळोवेळी चर्चा केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salary Increment in Walchandnagar Company Pune