खुशखबर! आता पगारात होणार वाढ अन् पीएफमध्ये...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

- कामगारांसाठी खुशखबर : पगारात दोन टक्‍क्‍यांनी वाढ होणार 
- केंद्र सरकारचा निर्णय : पुढील तीन महिने बारा ऐवजी दहा टक्केच पीएफ कापण्यास परवानगी

पुणे : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचारात घेऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने मालक आणि कामगारांना दिलासा दिला आहे. मे, जून आणि जुलै या तिन्ही महिन्यांचे पगारातून बारा टक्‍क्‍यांऐवजी बारा ऐवजी दहा टक्केच पीएफची रक्कम कापण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कामगार सध्या मिळणाऱ्या पगारात दोन टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. तर मालकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका उद्योग आणि व्यवसायांना बसला आहे. त्यातून दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना जाहीर करण्यात येत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न करू शकलेल्या मालकांना दंडाची रक्कम माफ करण्याचा, तर पंधरा हजाराच्या आत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला. यासारख्या मोठ्या निर्णयांचा त्यामध्ये समावेश आहे. त्या पाठोपाठ आता मे ते जुलै या तीन महिन्यांच्या पगारातून कापण्यात येणाऱ्या बारा टक्‍क्‍यांऐवजी दहा टक्के पीएफ कापण्यास केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. 

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

सध्या कामगारांच्या पगारातून बारा टक्के, तर मालक स्वतः:चे बारा टक्के असे मिळून 24 टक्के रक्कम पीएफच्या फंडात जमा करते. दर महिन्याला कामगारांच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाते. परंतु कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाली आहे. हे विचारात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात कामगारांच्या पगारातून दहा टक्के, तर मालकाने स्वत:चा हिस्सा म्हणून दहा टक्केच अशी वीस टक्के रक्कम पीएफ फंडात जमा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कामगारांच्या हातात पगारात दोन टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. देशभरातील काही लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. 
 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salary will be increased and PF cut percentage will decrease of Labour