वॅाल पेंटिगच्या माध्यमातून कोरोना योध्यांना सलाम....

wall painting.jpg
wall painting.jpg
Updated on

सहकारनगर (पुणे) : कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे खरे कोरोना योध्दे आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात हे खरे योद्धे करीत असलेले काम निश्चितच गौरवशाली आहे. अशा योध्यांचा गौरव सहकारनगर येथे तळजाई टेकडीवर जाणाऱ्या मार्गावर वॅाल पेंटिगच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

कोरोना योध्यांचा गौरव चित्र, धार्मिक भारतीय संस्कृती, परंपरा अशा विविध चित्रशैली नगरसेवक सुभाष जगताप यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर वॅाल पेंटिग करण्यात आली आहे. कलाकार (आर्टिस्ट) निलेश खराडे, योगेश खुडवड यांनी कोरोना योध्दे व भारतीय संस्कृती परंपरा असलेल्या वारकरी वॅाल पेंटिगच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, "कोरोनाच्या संकटाच्या काळात डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे आपल्यासाठी मुठीत जीव घेऊन काम करत आहेत. म्हणून त्यांचा गौरव केला पाहिजे या उद्देशाने हे वॅाल पेंटिग साकारण्यात आले आहे. समाजातील प्रत्येकाने कोरोना योध्दांचा गौरव केला पाहिजे. त्यांना समाधान लाभेल आणि प्रेरणा मिळेल. यासर्वांविषयी सहानुभूती व प्रेमाची भावना जागविली पाहिजे. "तसेच वारकरी भारतीय परंपरा असलेली संप्रदायचे विठू माऊली, राष्ट्रीय एकात्मतेचे अशी चित्र काढण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis
Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days
Exemplary Patriotism: 84-Year-Old Retired Teacher Donates ₹1 Crore for Soldiers' Welfare
High-Octane Chase: Narayangaon and Shirur Police Deploy Heavy Force After Highway Shootout
Marathi News Esakal
www.esakal.com