
वडगाव मावळ - येथील मल्हार रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या समर्थ जाधव (Samarth Jadhav) या बालकलाकाराला (Child Actor) आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘फिरस्त्या’ या चित्रपटातील अभिनयासाठी कोलकताच्या ‘व्हर्जिन स्प्रिंग सिनेफेस्ट २०२१’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (Best Actor Award) विशेष गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. (Samarth Jadhav Child Best Actor Award Declare)
अवघ्या आठ वर्षांच्या समर्थने मराठी चित्रपटसृष्टीत उत्तुंग भरारी घेत नावलौकिक केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांच्या ‘फिरस्त्या’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या ‘झुंजार मोशन पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेद्वारे झाली आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या अकरा देशांमधील २४ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकूण ५३ पुरस्कार मिळवीत पुरस्कारांचे ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे. भरपूर नामांकन आणि मानाचे पुरस्कार मिळवत जागतिक पातळीवर समर्थ जाधव याचे व वडगावचे नाव झळकू लागले आहे.
‘फिरस्त्या’ चित्रपटात अभिनय केलेल्या समर्थ यास या चित्रपटातील अभिनयासाठी कोलकताच्या ‘व्हर्जिन स्प्रिंग सिनेफेस्ट २०२१ मध्ये’ ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या या यशाबद्दल वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्याचा सत्कार केला. समर्थने मराठी चित्रपटसृष्टीत आंनदी गोपाळ, फिरस्त्या, बळी, काॅलेज डायरी, सरकारमान्य या चित्रपटांव्यतिरिक्त मराठी लघुपट, वेबसीरिज, जाहिरात आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समर्थचे कुटुंबीय मूळचे मळोली, माळशिरस येथील असून, त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आपल्या मुलांचे दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने वडगाव शहरात वास्तव्यास आहेत. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेला समर्थ तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील मार्गदर्शक प्रवीण भारदे यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेत आहे. कोरोनाचा काळ संपल्यानंतर हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.