गुरूवाणी १२

गुरूवाणी १२
Published on

‘सामायिक’ आवर्जून करा

जैन आगमात अतिशय महत्त्वाचे असलेल्या ‘सामायिक’चे रहस्य आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. ४८ मिनिटांचे सामायिक आत्मचिंतन, पाप मुक्ती असते, मन स्वच्छ होण्याची साधना असते. सामायिकसाठी अतिशय सहजतेने बसले पाहिजे. शरीर पूर्ण आराम अवस्थेत हवे. गुरुदेव संवत्सराला सकाळी ८ वाजता चौरंगावर बसायचे आणि थेट ४ वाजता उठायचे. असे सलग आठ तास बसूनही त्यांचे पाय आखडत नव्हते, सांधे दुखत नसायचे. ते सहजपणे उठायचे. सामायिक म्हणजे प्रथम शरीर संतुलित करणे. हे संतुलन जमले पाहिजे. दुचाकी चालतानाच बॅलन्स राहते. थांबली तर बॅलन्स रहात नाही. शरीरही दुचाकीसारखेच आहे. चालले तरच संतुलन राहील. आरामखुर्चीत शरीराला आराम मिळतो, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात जे आरामखुर्चीत जास्त वेळ बसतात त्यांना आजार होण्याची शक्यता असते. भगवान महावीरांसारखे, गुरुदेवांप्रमाणे आसनस्थ झाला, तर अशा समस्या अजिबात उद्‍भवणार नाहीत. सामायिक करताना आधी शरीर वेदना मुक्त करा. वेदनेची संवेदना नसली पाहिजे. दुःखची संवेदना दूर झाली की, सुखाची संवेदना जागृत होते. तुम्हाला खूप तहान लागली आहे, पण समोर दूषित पाणी असेल, तर आपण पित नाही. त्याच पद्धतीने दोषयुक्त सामायिक उपयोगाची नाही. सामायिक म्हणजे अंगाचे सूक्ष्म संचालन. शरीर, मन उत्कृष्ट करण्यासाठी हे करायचे. आपल्या चुकांना, दोषयुक्त कर्म, पाप नष्ट करणे आणि आतून शुद्ध होणे म्हणजेच सामायिक होय. तपस्या करणारांनी विशेष करून हे लक्षात ठेवावे. तपस्या करताना अवडंबर करू नका. तुम्हाला गुरुकृपा हवीय हे लक्षात ठेवावे. एका सामायिकमध्ये कर्म सिद्धांताला सुद्धा खोटे ठरवण्याची ताकद असते. राजा श्रेणिक आपल्या कर्मामुळे नरकात जाणे पक्के होते. तो तीर्थंकरांना शरण गेला. त्यांनी राजाला नरक गती थांबवण्यासाठी किमान एक सामायिक करण्यास सांगितले. गुरुदेवांनी खऱ्या अर्थाने स्थानकवासी समाजाला एकत्र आणले. अनेक वर्षे त्यांनी श्रमण संघाचे सर्वोत्कृष्ट संचालन केले. इथं आपल्याकडे कुटुंबात दोन भाऊ एकत्र ठेवणे कठीण होते. गुरुदेवांनी अशी अद्‍भूत सामायिक केली की, अस्ताव्यस्त मोत्यांची सुंदर माला बनवली. नवीन रस्ते तयार नका करू पण आहे, ते रस्ते उखडू नका. गुरुदेवांनी निर्माण केलेला संघ तोडण्याचे पाप करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com