esakal | संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji_Bhide

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भिडे यांची राज्यभर सर्वाधिक चर्चा झाली होती. भिडे हे दंगलीपूर्वी सहा वर्षे या भागात आलेले नव्हते.

संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले

sakal_logo
By
भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे तब्बल सात वर्षांनंतर शनिवारी (ता.9) वढु-बुद्रूक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती कळताच पोलिस समाधिस्थळी आहे आणि भिडेंना तेथे थांबण्यास मज्जाव केला. त्यामुळे भिडे तेथून तत्काळ निघून गेले. वाजेवाडी (ता.शिरूर) येथील एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेटून ते पुन्हा पुण्याच्या दिशेने गेले.

अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर​

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भिडे यांची राज्यभर सर्वाधिक चर्चा झाली होती. भिडे हे दंगलीपूर्वी सहा वर्षे या भागात आलेले नव्हते. मात्र, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते वढु-बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळी काही मोजक्‍या कार्यकर्त्यांसमवेत आले होते. 

शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ गाठले. या ठिकाणी भिडे आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना पाहून पोलिसांनी त्या सर्वांना समाधिस्थळी थांबण्यास मज्जाव केला. त्यानंतर भिडे तेथून तत्काळ निघून गेले. तेथून ते वाजेवाडी (ता.शिरूर) येथे आले. काही दिवसांपूर्वी एका अपघातात मृत्यू पावलेले अमित तिखे यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि पुण्याकडे पुन्हा मार्गस्थ झाले. 

लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने चीनी सैनिकाला पकडले!​

शिक्रापूर पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळाच्या बाबतीत संवेदनशील आणि सतर्क आहोत. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गोपनीय माहिती संकलीत करून त्यावर कार्यवाही केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image