'राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा आहे. शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधfत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षांनी करणे चुकीचे आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री, मुख्य निवडणुक आयुक्तांसह पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, प्रकाश धिंडले, महादेव मातेरे, टिळक भोस व सुमेध गायकवाड यांनी आपल्या मागणीचे निवेदन स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे दिले. तसेच संबंधीत निवेदन उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त यांनाही पाठविण्यात आले आहे. 

PHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा

राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा आहे. शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधfत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षांनी करणे चुकीचे आहे. प्रांत, भाषा, जात-धर्मावर आधारीत राजकारण करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करीत आहोत, असे संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji brigade demands case filed against Raj Thackeray on Rajmudra use in flag