esakal | पदवीधर निवडणूक : कोकाटेंच्या उमेदवारीबाबत संभाजी ब्रिगेडने दिले स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Shrimant_Kokate

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत राजकीय पक्षांनी ढवळाढवळ करु नये, ही काही राजकीय स्वरुपाची निवडणूक नाही आणि राजकीय पक्षांनी यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. 

पदवीधर निवडणूक : कोकाटेंच्या उमेदवारीबाबत संभाजी ब्रिगेडने दिले स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : पदवीधर मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे यांची उमेदवारी कायम ठेवली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१३) बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

इंदिराजींची स्वाक्षरी असलेला नेहरूंचा जीवनपट; पुण्यातील अवलियाचा छायाचित्रांचा स्मृतीसंग्रह

श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना गायकवाड यांनी कोकाटे हे पदवीधरसाठी अत्यंत योग्य उमेदवार असल्याचे नमूद केले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत राजकीय पक्षांनी ढवळाढवळ करु नये, ही काही राजकीय स्वरुपाची निवडणूक नाही आणि राजकीय पक्षांनी यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. पदवीधर मतदारसंघासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही. बहुजन समाजाचे प्रतिनिधी म्हणून ते निश्चित निवडून येतील, असा आपला विश्वास असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. 

कुणाल कामरावर खटला दाखल; पुण्यातील वकीलांची सुप्रीम कोर्टात याचिका​

पदवीधर मतदारसंघाची रचना ही वेगळी आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषद याहून हा मतदारसंघ वेगळा आहे. शिक्षणाशी संबंधित बाबी महत्वाच्या आहेत. दर्जेदार तसेच मोफत नाही तर माफक तरी शिक्षण मिळायला हवे. बेरोजगारांचा प्रश्न बिकट आहे, असे प्रश्न मांडणी करणा-यांची गरज आहे. 

दरम्यान भाजप व राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार राजकीय पार्श्वभूमी असलेले साखर सम्राट व विधानसभा लढवलेले आहेत, पदवीधर निवडणूकीत तरी किमान राजकारण येऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे, प्रत्यक्षात तसे होत नाही ही बाब निषेधार्ह आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)