कोरोनाविरोधात लढण्याची रणनीती बदला

Sambhaji patil writes About Change method to fight Against Corona
Sambhaji patil writes About Change method to fight Against Corona

मार्चमध्ये जी परिस्थिती इटलीमध्ये होती. तीच परिस्थिती सप्टेंबरमध्ये आपल्याकडे आहेत. तेथे कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांना स्मशानापर्यंत नेण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली होती. आपली लोकसंख्या जास्त असल्याने एवढी अवस्था आली नसली तरी आपली वाटचाल त्याच दिशेने आहे. पुण्यातील कोविडचे उपचार करणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलच्या बाहेर एक चक्कर मारा किंवा रेमडेसिव्हिरचे इंजेक्‍शन मिळावे यासाठी जळगावहून येऊन पुण्याच्या औषध वितरकाकडे याचना करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकाची तडफड पहा. एकूण परिस्थितीचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. गेली पाच सहा महिने ज्या भागात कोरोनाचा प्रसार नव्हता त्याठिकाणी म्हणजेच पुण्यातील कात्रज-धनकवडी, कोथरूड-कर्वेनगर, हडपसर, नगररस्ता, पुण्यालगतची आणि पुण्याशी दररोज संपर्क असणारी सासवडसारखी गावे येथे वाढीचा वेग मोठा आहे. ही संख्या आणखी वाढेल अशी शक्‍यताही आरोग्य विभागाने वर्तविली आहे. अशा परिस्थितीत लस येईपर्यंत स्वतःचे संरक्षण कसे करणार यावर लक्ष द्यावे लागणार आहे. त्याच्या रणनीतीची पुनर्रचना करावी लागणार आहे.

‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

प्रतिबंधात्मक उपाय करताना लॉकडाउन, कंटेनमेंट झोन, दुकाने, प्रवासावर निर्बंध असे त्या-त्यावेळी केलेले प्रयोग एकत्रित रिझल्ट पाहता तेवढे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे आता नव्याने विचार करण्याची गरज आहे. आपण सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चांगली असल्याचे सांगत आहोत. एकट्या पुणे व आसपास साडेतीन हजार जणांचे मृत्यू झाले आहेत, याकडे दुर्लक्ष करीत आहोत. गेले तीन महिने फक्त पुण्यात सरासरी अठरा हजार रुग्ण कोट्यवधी रुपये खर्च करून उपचार घेत आहेत. ही संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. पुणे तर सोडाच पण तालुक्‍याच्या ठिकाणीही सहजरीत्या बेड मिळत नाही. याला नक्कीच आरोग्य व्यवस्था नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नाही. जादा येणारे बिल, खासगी रूग्णालयांकडून होणारी लूट अगदी रेमडेसिव्हिर सारख्या इंजेक्‍शनच्या काळ्याबाजारावर "सकाळ' सातत्याने आवाज उठवीत आहे, पण तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे बदल होताना दिसत नाहीत. नागरिकांना आता सहज आणि परवडणारे उपचार हवे आहेत. एका बाजूला खात्रीचे उपचार आणि दुसरीकडे हाताला काम देणारी यंत्रणा या दोन गोष्टींना आता प्राधान्य हवे आहे. नागरिकांनीही दवाखान्याच्या दुष्टचक्रात अडकायचे नसेल तर स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण होईल, असे बदल दिनचर्येपासून कामापर्यंत करायला हवेत.

चुकांची ‘उत्सवी’ पुनरावृत्ती ठरेल घातक...

हे हवेत बदल
1. "मास्क' वापरण्यासाठी मास मूव्हमेंट
2. ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर आदींच्या किमती व वापराची "एसओपी'
3. औषधांचा काळाबाजार करणाऱ्या कंपन्या, वितरकांवर तत्काळ कारवाई
4. बेड आणि औषधांच्या उपलब्धतेची पारदर्शी माहिती
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com