हुकलेले नियोजन अन् चुकलेले उड्डाणपूल

घरात अंतर्गत सजावट करायची असली तरी त्याचे बारकाईने नियोजन केले जाते, उपयुक्तता तपासली जाते, घराचे सौंदर्य कसे वाढेल, कमीत कमी खर्चात काम कसे होईल, यावर भर दिला जातो.
flyover
flyoversakal
Summary

घरात अंतर्गत सजावट करायची असली तरी त्याचे बारकाईने नियोजन केले जाते, उपयुक्तता तपासली जाते, घराचे सौंदर्य कसे वाढेल, कमीत कमी खर्चात काम कसे होईल, यावर भर दिला जातो.

घरात अंतर्गत सजावट करायची असली तरी त्याचे बारकाईने नियोजन केले जाते, उपयुक्तता तपासली जाते, घराचे सौंदर्य कसे वाढेल, कमीत कमी खर्चात काम कसे होईल, यावर भर दिला जातो. त्यासाठी चांगला आराखडा तयार केला जातो. मग, जनतेच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उड्डाणपुलांचे नियोजन कसे व्हायला हवे? मेट्रोच्या कामासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडला जातो. सुमारे दहा वर्षापूर्वी बांधलेला हडपसरचा उड्डाणपूल नादुरुस्त झाल्याने वाहतुकीसाठी बंद करावा लागतो तर भूमीपूजन झाल्यानंतरही पूल कसा बांधायचा हे ठरत नसल्याने सिंहगड रस्त्यावरील पुलाचे कामच सुरू होत नाही, हे निश्चितच चांगले नियोजन नाही.

वाहतुकीची कोंडी केवळ उड्डाणपूल बांधल्याने कमी होत नाही. हे लक्षात आल्याने प्रगत देशांमध्ये उड्डाणपूल काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. आपण मात्र कोट्यवधी रुपये खर्चून योग्य पद्धतीने न बांधलेले उड्डाणपूल दुरुस्त करण्यात आपली अक्कल आणि पैसे खर्च करीत आहोत. म्हणजेच आपले नियोजन चुकते आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी व्हावी, यासाठीचे इतर प्रयत्न आपल्या गावीही नाहीत. दुसरीकडे जे उड्डाणपूल आपण बांधत आहोत, ते फारसे उपयुक्त आहेत, असेही नाही. पुण्यातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी नितीन गडकरी राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना १६३ कोटी रुपये खर्च करून ३२ उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली होती. रस्ते विकास महामंडळ हे पूल बांधणार होते, पण त्यावेळच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ही योजना होऊ दिली नाही.

flyover
दौंड - अपघातात सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा मृत्यू

राज्यात युतीचे सरकार जाऊन काँग्रेस आघाडी सत्तेवर आल्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातूनच हडपसर, विद्यापीठ चौक येथे रस्ते विकास महामंडळाच्यावतीने जादा पैसे मोजून उड्डाणपूल बांधण्यात आले. पण, या दोन्ही पुलांची डिझाईन चुकली असल्याचे तेव्हाच लक्षात आले. विद्यापीठ चौकातील पूल मेट्रोचे कारण देऊन पाडण्यात आला. हा पूल पाडल्यानंतर नव्या पुलाची उभारणी अद्याप सुरू न झाल्याने या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. यापेक्षा भयंकर परिस्थिती पुण्याचे दुसरे प्रवेशद्वार असणाऱ्या हडपसरची आहे. हडपसर उड्डाणपुलाच्या दोन खांबाजवळ गर्डरला तडे गेल्याने आणि एका खांबाचे बेअरिंग खराब झाल्याने हा पूल दीड महिन्यांसाठी बंद राहणार आहे. या पुलावर सोलापूर, सासवड, मगरपट्टा या तीन बाजूंची वाहतूक अवलंबून आहे. दररोज हजारो वाहने या ठिकाणाहून ये-जा करतात. उड्डाणपूल बंद असल्याने त्याचा प्रचंड ताण या भागातील वाहतुकीवर आला आहे.

रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या पुलावर नंतर महापालिकेच्यावतीने दुहेरी पूल बांधून त्याचा विस्तार केला. पण, मुळातच नियोजन चुकलेल्या या पुलाचा वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. रामटेकडी ते आकाशवाणी असा पाच किलोमीटर लांबीचा कहा मुळ उड्डाणपूल होता, मात्र महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तो सोईस्कर कमी केला. त्यानंतर या पुलाला दोन वेळा ठिगळे जोडण्यात आली. महापालिकेने त्यासाठी २५ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला. उड्डाणपुलावर वाहतूक नियमनासाठी सिग्नल बसवावे लागले, हा विक्रमही याच पुलाच्या नावावर आहे. आता हा उड्डाणपूल दुरुस्त होईल तेव्हा होईल. पण, तोपर्यंत या रस्त्यावर होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ चौकाप्रमाणे विविध पर्यायांचा विचार करावा.

flyover
किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण; सुरक्षा रक्षक निलंबीत, ३३ जणांच्या बदल्या

सिंहगड रस्ता हे पुण्याचे आणखी एक प्रवेशद्वार. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अगदी सिंहगडपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. एकच असणारा रस्ता येथे अपुरा पडत आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची आहे. त्यावर मार्ग म्हणून राजाराम पूल ते फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामाची वर्कऑर्डरही संबंधित ठेकेदाराला देण्यात आली. मात्र, या ठिकाणी मेट्रो आल्यानंतर काय होणार यावरून वाद सुरू आहे. या भागातील नगरसेवकांनी मेट्रो आणि

उड्डाणपूल यांच्या पिलरचे काम एकदाच करावे, अशी मागणी लावून धरली आहे. शहरातील इतर उड्डाणपुलांचा अनुभव लक्षात घेता येथे तरी नियोजन नीट व्हायला हवे, अन्यथा काही त्रुटी राहिल्यास हडपसर पेक्षाही भयंकर परिस्थिती या रस्त्यावर निर्माण होईल. एवढ्या महत्त्वाच्या, जोखमीच्या व दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या कामांबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीचा आणि भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा विचार व्हायलाच हवा. अन्यथा पुणे केवळ वाहतूक कोंडीचे शहर होईल, त्यातून बाहेर पडणे कठीण होईल.

हे नक्की करा

  • शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा नव्याने तयार करावा.

  • मेट्रो, लाइट रेल्वे, बीआरटी या सर्वांचा एकत्रित विचार करून उड्डाणपुलांचे नियोजन

  • वाहतूक कोंडी तेथे उड्डाणपूल याऐवजी इतर पर्यायांचा विचार व्हावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com