
पुणे : ‘‘महाराष्ट्रातील राजकारण विचित्र पद्धतीने सुरू आहे. सुसंस्कृतता हा शब्द राजकारणातून हद्दपार झाला आहे. राजकारण्यांना ऐतिहासिक घराण्यांचे महत्त्व उरलेले नाही; किंबहुना ही घराणी संपतील, असाच त्यांचा प्रयत्न आहे. आपले गड-किल्ले, वाडे यांच्या जतन-संवर्धनासाठी कोणीही पाठबळ देत नाही. इतिहासाबाबत सगळ्याच राजकारण्यांची ही उदासीनता पाहून अतिशय वाईट वाटते’’, अशी खंत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी व्यक्त केली.