esakal | आमचे विचार एकच; उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : ''आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत, संभाजीराजे यांच्या विचारांसोबत मी सहमत आहे. दोघांचे घराणे आणि विचार एकच आहे. भेट झाल्यामुळे मनापासून आनंद झाला आहे. 16 तारखेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही.'' अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट घेतली.(Udayanraje Bhosale support Chatrapati Sambhaji raje for the Maratha agitation on 16th june)

''राज्यकर्ते आरक्षण देत नाहीत. दोन जातीमधील मतभेद वाढत आहे. राजकर्ते ही दुफळी निर्माण करतात. दुफळी निर्माण करणार राजकारण धोकादायक आहे. वेळीच मागण्या स्विकारल्या नाहीतर उद्रेक होणार आणि त्यासाठी राजकर्ते जबाबादार असतील. राजकरण्यांना काही करायचे नाही. स्वार्थासाठी वाद पेटवला जातोय. मतपेटीसाठी हे राजकारण करत आहेत.'' अशा शब्दांत उदयनराजेंनी राज्य सरकारवर टिका केली आहे.

हेही वाचा: 'अनेक मुद्द्यांवर दोघांचे एकमत'; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सगळीकडे तीव्र प्रतिसाद उमटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे पाहिले जात आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेत संभाजीराजे छत्रपतींनी यांनी राज्यभर दौरे करत नेत्यांच्या भेटी घेतल्या. येत्या16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

loading image
go to top