'...म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शरद पवार यांच्यावर केली.

पुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शरद पवार यांच्यावर केली. 

पुण्यात भाजपच्या कार्यालयात कलम ३७०च्या मुद्द्यावर आयोजित पत्रकार परिषदेत पात्रा बोलत होते. खासदार गिरीश बापट, संजय काकडे, राष्ट्रीय एकता अभियानाचे संयोजक राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, त्याबाबत ईडीच पत्रकार परिषद घेऊन सांगू शकेल. ती कारवाई पूर्णता: स्वतंत्र आहे. पण ईडीचा अर्थ एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असा होतो, इवेंट डेव्हलपमेंट असा होत नाही, असा टोला ही पात्रा यांनी मारला. 

कलम ३७० वर पात्रा म्हणाले, ''गेल्या ७० वर्षापासून ३७० हटवने चर्चेत होता. पण राजकारण व मतांच्या लांगुलचालनामुळे हा निर्णय काँग्रेस घेण्यास टाळाटाळ करत होते. पण नरेंद्र मोदी मोदी व अमित शहा यांच्या इच्छाशक्तीमूळे हे कलम जम्मू कश्मीर मधून हटले. प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. हे कलम रद्द केल्याने फुटीरतावाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि तीन परिवारांचे राजकारण संपणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये खरऱ्या अर्थाने लोकशाही व विकास येणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पैसा देण्यात आला पण तेथील तीन परिवारांनी तेथील विकास रोखला,''अशी टीका पात्रा यांनी केली. 

काँग्रेस नेत्यांनी देशाची माफी मागावी 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी (ता.२८) युनियटेड नेशनमध्ये भाषण करताना तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणाचा हवाला देत "भारत हा हिंदू दहशतवादाचा अड्डा म्हटले होते, असे तेथील माजी गृहमंत्र्यांनी सांगितले होते" असे वक्तव्य केले. यावर पात्रा यांनी काँग्रेसला लक्ष करत जयपुर येथील कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे भाषण करताना व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे भारताची बदनामी झाली. याबद्दल सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambit Patra predict about Ajit pawar Resignation as MLA