MPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंगबद्दल मोठा निर्णय; राज्यसेवेची तयारी करणाऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

- राज्यसेवेची तयारी करणाऱ्यांना दिलासा
- अपूर्णांकातच निकाल जाहीर होणार

पुणे :  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व प्रकारच्या बहुपर्यायी परीक्षांकरीता (एमसीक्यू) आता नकारात्मक गुणांसाठी (निगेटीव्ह मार्किंग) एकच सूत्र लागू होणार आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के किंवा १/४ गुण मिळालेल्या एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग नव्हते, त्यामुळे विद्यार्थी योग्य उत्तर माहिती नसले तरी एका पर्यायाला गोल करून टाकायचे. यात सुधारणा करत 'एमपीएससी'ने २००९ पासून निगेटीव्ह मार्किंग सुरू केले. त्यामध्ये चार चुकीच्या उत्तराला एक गुण वजा करण्यात येत होता. राज्य सेवा परीक्षेला तीन चुकीच्या गुणांना एक गुण कमी होत असे. या दरम्यानच्या काळात थोडेफार बदल करण्यात आले होते. आता नवीन पद्धतीने गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जाहीर होणार या परीक्षेच्या परीक्षेच्या तारखांना ही पद्धत अवलंबिली जाणार आहे. हे आहेत बदल

प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या  उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. 

या कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच  राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही. असा बदल एमपीएससी'ने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयोगामार्फत यापुढे जाहीर होणाऱ्या 
स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांच्या निकालाकरीता हा नियम लागू राहील. आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत उपरोक्त कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे अयोगाने परिपत्रकात नमूद केले आहे. 

"आयोगाने नकारात्मक  गुण पद्धतीत केलेला बदल उमेदवारांसाठी सुखद असून विशेषतः राज्यसेवा परीक्षेत प्रश्न सोडविण्याचे प्रमाण वाढून पर्यायाने गुणांमध्येही वाढ होऊ शकते."
 - डॉ. सुशील बारी, मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा 

"राज्य सेवेसाठी पूर्वी तीन चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होत होता. आता चार चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होईल. निगेटीव्ह मार्किंगचा धोका धोका कमी झाल्याने प्रश्न सोडविण्याचे प्रमाण वाढेल. या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे."
- अनुप देशमुख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The same formula of negative marking for all MPSC exams