जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली

जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली

धायरी : गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेल्या कोरोनामुळे अनेक वेगवेगळ्या व्यवसायांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. प्रत्येक लहान मोठा घटक या परिस्थितीत होरपळून निघत आहे. त्यातही असा एक व्यवसाय आहे जो आपल्या महत्वाच्या आनंदाच्या क्षणी त्याच्या वाद्याच्या सुरांनी कार्यक्रमाला चारचाँद लावतो, तो व्यवसाय म्हणजे सनई-चौघडा वादकांचा. कुठल्याही समारंभाला सनईचौघडा या पारंपारिक वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु गेल्या दिड वर्षाची परिस्थिती पाहता या वाद्याचा आवाज ना लग्न समारंभात कानी पडतो, ना कुठे धार्मिकप्रसंगी ना इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने. (Sanai Samrat Ramesh Pachange need help to Survive during Corona pandemic) 

ज्या लग्न समारंभ तरुणांचा आवडता विषय म्हणजे परण्या आणि वरात त्यात प्रत्येकाला सनई चौघडा हवाच असतो. पण आता हे चित्र जरा कोरोनामुळे बदललं आहे. सरकारने लग्नासाठी लागू केलेल्या निर्बंधामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. त्याच बरोबर सामाजिक कार्यक्रमांवरी ही मर्यादित संख्या असावी असे आदेश प्रशासनाने जारी केले आहे आहे. धार्मिक कार्यक्रमही वर्षभर मंदिर बंद असल्यामुळे ते ही मिळणे मुश्किल. यातच उभा राहतो तो वादय परंपरा जपण्याचा आणि या भयंकर परिस्थितीत कुटुंबाला जगवण्यासाठीची धडपड.  

जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली
आंबेगाव तालुक्यात निर्घृण खूनाच्या दोन घटना, संशयित आरोपींना अटक

ज्याच्या वादयाच्या मंगल सुरांनी अनेक नवीन नाती जोडली गेली तेच आता या महामारीत आपल्या कुटुंबातील नाते जगवण्यासाठी लढा देत आहेत. कोरोना काळात विविध स्तरातून वेगवेगवळ्या लोकांना-कलाकारांना मदत मिळाली पण मात्र सनईचे सूर मात्र या मदतीपासून वंचितच राहिले. 'कोरोनाच्या महामारीत गेल्या दीड वर्षापासून काम बंद असल्याने ना सरकारी मदत ना इतर कुठल्याही प्रकारची मदत यामुळे जीवन नकोसे असल्याचे'' मत सकाळशी बोलताना पाचंगे यांनी व्यक्त केले. सनई चौघडा वादय कलाकारांच्या मदतीसाठी पुढे सरसावले काहींनी पुढाकार घेतला आणि जागतिक कीर्तीचे सनई चौघडा सम्राट रमेश पांचगे व त्याच्या इतर सहाकाऱ्यांना मदतीचा हात देऊ केला. काकासाहेब चव्हाण यांच्यासह चंद्रशेखर पोकळे, मोहन भिसे, दिनेश बडसें महेश माने आणि अनिकेत चव्हाण यांनी पुढाकार घेत सनई चौघडा वादय कलाकारांची मदत केली असली तरी राज्यभरातून दानशूर लोकांन पुढे येणं गरजेच आहे.

जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली
पिंपळवंडी गावात सापडले रोमन जात्याचे अवशेष

"शासनाचे कार्यक्रम बंद आहे तसेच इतर कार्यक्रम ही बंद असल्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांवर आता उपासमारीची परिस्थिती आहे.त्यातच आम्हाला सरकारच कुठलच अनुदान किंवा मदत मिळाली नाही. मग आता आम्ही जगायच कसं आणि कुटूंबाला जगवायचं कसं असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. सरकारने जशी मदत इतर लोकांना केली तशीच मदत आम्हाला करावी."

- रमेश पांचगे, सनईचौघडा सम्राट.

"कोरोनाची महामारीत गेल्या दीड वर्षापासून आली त्यामुळे या वादकांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील सरकारी उपक्रम असतील ते बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.  आम्ही आमच्या परीने कलाकारांना मदत करत आहोत परंतु हे कलाकार संघटीत नाही किंवा यांची कुठली ही संघटना नाही, त्यामुळे त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही. ज्याप्रमाणे सरकारने रिक्षावाले असतील अन्य व्यवसाय असतील त्यांना मदत केली त्याचप्रमाणे या कलाकारांना ही सरकारने मदत करायला हवी आहे. "

-काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, राष्ट्रवादी खडकवासला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com