esakal | पिंपळवंडी गावात सापडले रोमन जात्याचे अवशेष
sakal

बोलून बातमी शोधा

roman stone

पिंपळवंडी गावात सापडले रोमन जात्याचे अवशेष

sakal_logo
By
सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी (ता. जुन्नर)

पिंपळवंडी : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील गावठाणात रस्त्याचे काम सुरु असताना त्यातील दगडमातीत अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहन कालीन रोमन जात्याचे अवशेष नुकतेच मिळाले आहेत. सदर जाते आडव्या दांड्याचे असून त्याचा वरील भाग सापडलेला आहे. रस्त्याचे काम सुरु असताना त्यातील दगडमाती हि एका ठिकाणी टाकली असता त्यात आयुब इनामदार व डॉ. संदीप रोहकले यांना एक घडीव दगड निदर्शनात आला असता त्यांनी लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांना याची माहिती दिली. कसबे यांनी या जात्या बद्दलची माहिती पुरातत्व अभ्यासकांना विचारली असता सदर जाते हे इसवी सणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील असावे असे सांगितले. लवकरच कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सदर जागेला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: पुणे शहरात आज होणार ६९ केंद्रांवर लसीकरण

त्याच प्रमाणे इतिहास अभ्यासक अशोक नगरे यांनीही सदर जाते हे सातवाहन काळातील असुन जुन्नरमध्ये अशी जाती यापूर्वीही सापडल्याची माहिती त्यांनी दिली. त्याच प्रमाणे तेर व पैठण येथील संग्रहालयात तसेच जुन्नरचे इतिहास अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांच्या संग्रहात याप्रकारचे जाते असुन बोरी गावातही असे जाते सापडलेले आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

पिंपळवंडी हे गाव दोन हजार वर्षांपुर्वीच्या कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावरील गाव असुन कुकडी नदीच्या किनारी वसलेले आहे तसेच या नदीच्या दुसऱ्या तीरावर वैशाखखेडे हि पिंपळवंडीची एक वस्ती वसलेली आहे. सातवाहन सम्राज्ञी राणी नागणिकेने नाणेघाटाची निर्मिती केलेली असुन त्यावेळच्या व्यापारी मार्गावरील ते महत्वाचे स्थान होते तसेच घाटाच्या खाली वैशाखखरे हे एक गाव आजही अस्तित्वात आहे.

हेही वाचा: पुणे : एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र; संख्या झाली दुप्पट

पिंपळवंडी येथील वैशाखखेडे व मुरबाड तालुक्यातील वैशाखखरे हे गाव त्यावेळच्या व्यापाऱ्यांच्या थांबण्याच्या जागा होत्या. यावरून हे सिद्ध होते की पिंपळवंडी गावात सातवाहन काळात लोकवस्ती होती तसेच ते एक जुन्नर तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र होते. पिंपळवंडी गावात दोन हजार वर्षांपुर्वीचा ठेवा सापडल्याने गावचा इतिहास नव्याने पुढे येण्यास मदत होणार आहे.