तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तरीही समृध्दीवर आंदोलन आंदोलकांचा गमिनी कावा यशस्वी

तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तरीही समृध्दीवर आंदोलन  आंदोलकांचा गमिनी कावा यशस्वी
Published on

सेंट्रल डेस्कसाठी पान-१ साठी
-------------
SNR26B22264
गोंदे (समुद्धी महामार्ग) ः पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही गनिमी काव्याने येत येथे रास्तारोको आंदोलन करताना संगमनेर येथील नागरिक, आंदोलक.
--------
SNR26B22263
गोंदे ः पोलिसांना चकवा देत समृद्धी महामार्गावर आंदोलन करणाऱ्यांना बाजूला करताना शीग्र कृती दलाचे जवान.
--------------
पोलिसांना चकवा देत
‘समृद्धी’वर रास्तारोको
-------------
संगमनेरचे पाचशेहून अधिक नागरिक सहभागी
----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.९ ः नाशिक-पुणे रेल्वेमार्ग मूळ आराखड्याप्रमाणे सरळ व्हावा यासाठी गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्गावर गनिमी काव्याने संगमनेरच्या पाचशेहून अधिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असूनही वाहनातून येत हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. दरम्यान शीघ्र कृती दलाच्या जवानांनी धाव घेत आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तोवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता.
रेल्वे कृती समितीने आंदोलनाची घोषणा केली असली तरी समृद्धी महामार्गावर आंदोलन होवू नये यासाठी तब्बल २८८ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन सुरु झाल्यानंतर समृद्धीला जाणारे रस्ते अडविण्यात आले होते. सर्व बाजूंनी अडथळे व चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, संगमनेर येथून आलेल्या पाचशेहून अधिक आंदोलकांनी शिर्डी टोल नाक्यावरुन वाहनांसह आत प्रवेश केला. गोंदे येथे येऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहने आडवी लावून मार्ग रोखून धरला. वाहनांतून खाली उतरून महामार्गावर बस्तान मांडले.
एकीकडे पुण्याकडून समृद्धीवर आंदोलकांना जाऊ दिले जात नव्हते तर दुसरीकडे थेट वाहनांतून समृद्धीवर आलेल्या आंदोलकांनी रास्ता रोको सुरु केला. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दलाच्या जवानांची धावपळ झाली. आंदोलकांना हाताने धरुन, जागेवरुन उचलून महामार्गावरुन बाजूला करण्यात येत होते. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरही वाहनांचा लांबवर रांगा लागल्या होत्या. ‘रेल्वे आमच्या हक्काची...., नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सरळ झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. समृद्धीवरुन आंदोलकांना बाजूला करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. काही वेळाने सर्व आंदोलकांना बाजूला केल्याने अर्धा तासानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस खात्यातील तब्बल २६ विभागांचे कर्मचारी, अधिकारी आंदोलनस्थळी बंदोबस्ताकरीता होते.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com