सतरावर्षीय चिन्मयचे संगीत नाटक रंगमंचावर

अभय सुपेकर  
गुरुवार, 3 जानेवारी 2019

आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर. शिवाय, फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला टॅग करा #SakalPositive या हॅशटॅगद्वारे.

पुणे - संगीत नाटकांची परंपरा संपल्याबद्दल हळहळ व्यक्त होत असताना नवेकोरे संगीत नाटक रंगमंचावर आणण्याचे धाडस चिन्मय मोघे या सतरावर्षीय युवकाने केले आहे. ‘संगीत चंद्रप्रिया’ हे त्याचे नाटक येत्या १६ जानेवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पहिल्यांदाच रंगमंचावर येत असून, त्याची निर्मितीच नव्हे तर लेखन-दिग्दर्शनही त्यानेच केले आहे.

पुण्यातीलच स. प. महाविद्यालयात बीएच्या पहिल्या वर्षाला असलेला चिन्मय लेखनवेडा आहे. आपल्या वाटचालीबाबत तो सांगतो, ‘‘सध्या वृत्तातील लेखन दुर्लक्षित होत आहे, तरीदेखील आतापर्यंत मी ७० वृत्तांत लेखन केले आहे, स्वतःची १२ वृत्ते निर्माण केली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महाकाव्य समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील साडेतीन हजार श्‍लोकांचे महाकाव्य लेखणीबद्ध केले आहे. त्यासाठी बखरी, विविध प्रकारचे लेखन यांचा अभ्यास केला. ‘प्रेमगंध’ आणि ‘ऊर्मिला’ या दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्या लवकरच प्रकाशित होणार आहेत. ‘ऊर्मिला’ ही रामायणातील लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला हिच्या विरहाची कहाणी आहे, तर ‘प्रेमगंध’ ही कल्पनाविश्‍वातील साम्राज्यातील युद्धाची कहाणी आहे.’’ 

धुळे, नांदेड, रत्नागिरी, पुण्यासह नाशिकमध्ये शिकलेल्या चिन्मयला त्याचे वडील आणि नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे आणि आई श्रुती यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या संस्कारात त्याची आतापर्यंतची जडणघडण झाली आहे. सहावीपासून वृत्तबद्ध काव्यलेखन करणाऱ्या चिन्मयने गझल आणि इतर पान ८ वर 

सकारात्मक आणि ऊर्जा देणारे खूपकाही आसपास घडत असते. ही विधायकता वाचकांसमोर मांडण्याची ‘सकाळ’ची भूमिका सातत्याने राहिली आहे. आजच्या अंकामध्ये ‘विधायक’ विषय जरूर वाचा. अशी विधायकता आपल्या दृष्टीसमोर असेल, तर आवर्जून आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर. शिवाय, फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला टॅग करा #SakalPositive या हॅशटॅगद्वारे.

Web Title: sangeet Chandrapriya program will be in Pune on January 16