

सांगली जिल्हा बँकेसाठी चारपर्यंत ८९.९० टक्के मतदान
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी रविवार (ता.१) सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. चार दोन वाजेपर्यंत ८९.९० टक्के मतदान झाले. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत सहा जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२६-३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहा जागांवर रविवारी (ता. १) जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज तालुका सोसायटी गटांसह अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती या सहा गटांत एकूण २,४४६ मतदार आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ३५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारापर्यंत ४७.१० टक्के, तर दुपारी दोन वाजेपर्यंत १,८८३ म्हणजेच ७६.९८ टक्के मतदान झाले.
मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची लगबग पाहायला मिळाली. आपापल्या गटातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी उमेदवार आणि समर्थकांकडूनही प्रयत्न सुरू होते. त्यामुळे मतदानाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत मतदानाचा वेग वाढला असून, दुपारअखेर अनेक केंद्रांवर ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.
चौकट ----
जत येथील मतदान केंद्रावर मतदानाच्या गोपीनियेचा भंग केला म्हणून माजी आमदार विक्रमसिंह सावंत व समर्थकांनी आक्षेप घेतला. अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.