एसटी बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास

एसटी बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास
Published on

एसटी बसमध्ये चढताना महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास
१ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरीला; सांगोला बसस्थानकातील घटना

सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ७ : सांगोला एसटी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पिशवीतील पाकिटातून सोन्याचे मणीमंगळसूत्र व चार हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
याबाबत अनिता बाळासाहेब सावंत (वय ४५, रा. वासुद, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सावंत या वासुदहून पारे येथे जाण्यासाठी सांगोला बसस्थानकात आल्या होत्या. पारेकडे जाणारी बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढून सीटवर बसल्या. त्यानंतर वायरच्या पिशवीतील पाकीट तपासले असता ते आढळले नाही.
बसस्थानक परिसरात शोध घेऊनही पाकीट मिळाले नाही. त्यात १० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र आणि चार हजार रुपये रोख होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पाकीट चोरल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com