शेकाप - साळुंखे-पाटील आघाडीची तर शिवसेना - भाजप युतीची शक्यता; दोन्ही राष्ट्रवादींच्या भूमिकेकडेही लागले लक्ष

शेकाप - साळुंखे-पाटील आघाडीची तर शिवसेना - भाजप युतीची शक्यता; दोन्ही राष्ट्रवादींच्या भूमिकेकडेही लागले लक्ष

Published on

PNE26V87565
बाबासाहेब देशमुख
---
PNE26V87566
शहाजीबापू पाटील
---
PNE26V87570
दीपकआबा साळुंखे-पाटील
---
PNE26V87574
चेतनसिंह केदार-सावंत
--
PNE26V87577
अतुल पवार
---
आघाडी-युतींच्या हालचालींमुळे तापले वातावरण
विविध पक्षांच्या संभाव्य समीकरणांमुळे सांगोल्यात निवडणुकीची वाढली रंगत
दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १८ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आघाडी- युतीच्या चर्चांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांच्या बैठका, पडद्यामागील बोलणी आणि संभाव्य समीकरणांमुळे नागरिकांमध्येही राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या शेतकरी कामगार पक्ष व दीपकआबा साळुंखे- पाटील गट एकत्र येण्याची दाट शक्यता असून, त्यांच्याविरोधात शिवसेना- भाजप महायुती उभी राहण्याची चर्चा आहे. या समीकरणांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
नगरपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर तालुक्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शेकाप, दीपकआबा साळुंखे- पाटील गट, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी विविध पातळ्यांवर रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. सुरवातीला एकत्रित निवडणूक लढविण्याच्या चर्चा असल्या, तरी सध्या आघाडी- युतींची स्पष्ट विभागणी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी आधीपासूनच सुरू केली असून, निवडणूकपूर्व कामांना गती दिली आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही विविध गटांत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याने काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ द्विपक्षीय न राहता बहुपक्षीय संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकूणच, आघाडी-युतीची गणिते, संभाव्य दुरंगी-तिरंगी लढती आणि उमेदवारांच्या हालचाली यामुळे सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
---
चौकट
जवळा, चोपडी, कडलास गटाकडे सर्वांचे लक्ष
जवळा व चोपडी हे सर्वसाधारण गट आघाडी-युतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून, या गटांभोवती राजकीय हालचाली वाढल्या आहेत. कडलास गट महिला सर्वसाधारण असल्याने या गटातही सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. परिणामी जवळा, चोपडी व कडलास या गटांभोवतीच तालुक्याचे राजकीय लक्ष केंद्रित झाले आहे.
---
काही गटांत दुरंगी, तर काहींत तिरंगी लढतीची शक्यता
तालुक्यात सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती गण आहेत. सध्या पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद गटांवरच सर्वाधिक लक्ष केंद्रित झाले आहे. पंचायत समिती गणांमध्ये शेकाप अधिक जागा लढविण्याच्या तयारीत असला, तरी प्रमुख नेत्यांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद गटांबाबतची बोलणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
---
ठळक बाबी...
- जिल्हा परिषद गट (७) : महूद बु., एखतपूर, जवळा, कडलास, चोपडी, कोळा, घेरडी

- पंचायत समिती गण (१४) : महूद बु, चिकमहूद, वाकी-शिवणे, एखतपूर, वाढेगाव, जवळा, कडलास, अजनाळे, राजुरी, नाझरा, कोळा, हातिद बु., सोनंद, घेरडी
- पंचायत समिती सभापती आरक्षण : सर्वसाधारण महिला
---
२०१७ चे पक्षनिहाय बलाबल
- जिल्हा परिषद : शेकाप ३, राष्ट्रवादी २, शिवसेना २
- पंचायत समिती (सत्ता : शेकाप) : शेकाप ८, राष्ट्रवादी २, शिवसेना ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com