

MHD26B05313
सांगोला : विद्यामंदिर प्रशालेतील दहावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा ९९.३७ टक्के निकाल
महूद, ता. ९ : सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.३७ टक्के लागला असून ४८२ विद्यार्थ्यांपैकी ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील सिद्धी अमोल उकळे हिने ९९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अर्जुन सावंत याने ९८.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर जिज्ञासा घाडगे हिने ९८.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. प्रशालेतील २७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२ आहे.
परीक्षेत २१२ विद्यार्थी विशेष श्रेणीत, १७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणारे ७ विद्यार्थी, तर संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविणारे २ विद्यार्थी असल्याचे प्रशालेकडून सांगण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार
सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील दहावी परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.