
Sangvi Traffic
Sakal
जुनी सांगवी : सांगवी परिसरातील प्रमुख चौक व रस्ते महापालिकेने प्रशस्त आणि रुंद केले. मात्र, बेकायदा आणि बेशिस्त पार्किंगमुळे ते अपुरे पडू लागले आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक वाहने, नोकरदार वर्गाला रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून दंडात्मक कारवाई केली जाते. पण, ती केवळ दिखाव्यापुरती असल्याने सांगवीकरांत नाराजी आहे.