esakal | सांगवीत डॉक्टर, मराठी कलाकारांचा सत्कार | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सांगवीत डॉक्टर, मराठी कलाकारांचा सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : जुनी सांगवीतील शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शर्मिला गायकवाड, मराठी अभिनेता सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता देशमुख आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या महिला शिक्षकांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी डॉक्टर व मराठी कलाकारांचा मंडळाच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, शिवराज शितोळे, तनया राव, तेजल कोळसे पाटील, मुख्यध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बांठिया, प्रिया मेनन, आशा घोरपडे, नीलम पवार, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top