मणिपूरच्या दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षणसेवा 

मणिपूरच्या दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षणसेवा 

मणिपूर राज्यातील इजरोंग या दुर्गम भागातील बालकांना शिक्षण द्यायला पुण्यातील सानिया किर्लोस्कर ही तरुणी दीड वर्षं त्यांच्यात राहिली. तेथील निसर्गसौंदर्याबरोबरच स्थानिकांचं दैनंदिन खडतर आयुष्यही तिनं जवळून पाहिलं. लोकजीवनातील विविध गोष्टींमधील विज्ञान मुलांना समजावून सांगण्यातला आनंद घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोंगरदऱ्यांच्या रम्य परिसरातील ते गावं. इजरोंग त्याचं नाव. नागा आदिवासी हे तिथले रहिवासी. शालेय शिक्षण घेणारी त्यांची पहिली पिढी ठरणाऱ्या बालकांबरोबर ज्ञानाचं आदान-प्रदान करण्याची संधी सानियाला मिळाली. ती म्हणाली, "टीच फॉर इंडिया फेलोशिपमुळे मला शिक्षणक्षेत्रात वेगळं काही करून पाहण्याची संधी मिळाली. या अंतर्गत वडगाव बुद्रुकमधील वंचित मुलांच्या शाळेत दोन वर्षांसाठी माझी नेमणूक केली. वर्गाचा कायापालट कसा करावा, शाळेत अपेक्षित बदलांसाठी कृतिकार्यक्रम कसे आखावेत, विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमतांचा वेध कसा घ्यावा, त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा परिचय करून द्यावा आदी नवे पैलू समजले. शहरी मुलांपेक्षा ग्रामीण व त्यातूनही दुर्गम भागातील मुलांना वेगळ्या प्रकारे शिक्षण द्यावं लागतं, याचं भान आलं. फेलोशिप अंतर्गत मला ऋषिकेशजवळच्या गुलरदोगी गावातील शासकीय शाळेत वर्षभर काम करायला मिळालं. तेथील विद्यार्थ्यांचं गणित व इंग्रजी पक्कं करून घ्यायची जबाबदारी माझ्यावर होती. घरोघरी जाऊन पालकांचा सहभाग मुलांच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये मिळवावा लागत होता.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सानियाने असंही सांगितलं की, फेलोशिपदरम्यान लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या शाळेत महिनाभर काम करायला मिळालं. भटकंती व शिक्षणाबाबत नवे प्रयोग करून पाहणं, या माझ्या दोन्ही आवडीची सांगड घातली गेली. आत्मविश्वास वाढला. नंतर इजरोंग या गावात शिकवायची संधी मिळाली. येथील नागा आदिवासींच्या जगण्याचं मुख्य साधन म्हणजे शिकार आणि मासेमारी. वीज नाही. गावात एकही दुकान नाही. अशा ठिकाणी निवृत्त कर्नल ख्रिस्तोफर रेगो यांनी स्थापलेल्या सनबर्ड ट्रस्टच्या शाळेत मला स्कूल लीडर म्हणून नेमलं. शाळा शिकणारी ती पहिली पिढी होती. त्या मुलांना त्यांच्या रोजच्या जगण्यातली विज्ञानाची बाजू उलगडून दाखवणं, कला व रंगभूमी या माध्यमांतून अभिव्यक्तीला वाट करून देणं आदींसंदर्भात प्रयोग केले. विज्ञान प्रयोगशाळा व संगीतकक्ष सुरू करून मुलांना नव्या जगाची ओळख करून दिली, याचं समाधान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com