
पुणे : कचरा संकलन करण्यास येणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यास घरातील कचरा उचलण्याच्या कारणावरून एका कुटुंबाने मारहाण केली. या घटनेत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनाही मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी कोंढवा येथील साईनगर परिसरात घडली.