
पुणे : पुणे महापालिकेत मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी आहेत, ते शहर स्वच्छ ठेवत आहेत, पण त्यांना सोई सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. घाण भत्ता मिळत नाही, वेळेवर पगार दिला जात नाही अशा अनेक तक्रारी आज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राज्य सफाई कर्मचारी आयोगापुढे मांडल्या. त्यावरून आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवा, त्यांना त्यांचा पगार, फंड याबाबत संपूर्ण माहिती दिलीच पाहिजे असे बजावले.