कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत केलं जातंय...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

- बारामतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण मोहिम

बारामती : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात आज नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण मोहिम राबविण्यात आली. बारामती शहर पोलिस ठाणे, ढोर गल्ली, सिध्देश्वर गल्ली, बुरुड गल्ली, कैकाड गल्ली, स्टेशन रस्ता, संपूर्ण मारवाड पेठ, भिगवण चौक, इंदापूर चौक, तीन हत्ती चौक, गांधी चौक, गुनवडी चौक, सुभाष चौक, शारदा प्रांगण परिसरासह कसब्याच्या विविध भागातही ही मोहिम आज राबविली गेली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छतेबाबत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्षांनी प्रशासनाला संपूर्ण शहर स्वच्छतेचे आदेश दिले होते. आज सकाळपासूनच चार छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहिम शहरात सुरु करण्यात आली होती. शहरातील गर्दीची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी हे निर्जंतुकीकरण केले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitization Started In Baramati