कापड व्यावसायिक बातमी

कापड व्यावसायिक बातमी
Published on: 

PNE26W61301
अहिल्यानगर ः अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी ठोक कापड व्यापारी संघाचे सदस्य संजय चोपडा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना सदस्य.

व्यापारी समाजात एकोपा जपण्याची गरज
सचिन चोपडा ः कापड व्यापारी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात
अहिल्यानगर, ता.२४ ः व्यापारी समाजात परस्पर विश्वास, स्नेह आणि एकोपा जपण्याची गरज आहे. स्नेहमेळाव्यांमुळे सभासदांमधील आपुलकी वाढते, विचारांची देवाणघेवाण होते आणि संघटना अधिक मजबूत बनते. व्यापाऱ्यांचे हित जपतानाच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संघटना नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन अहिल्यानगर ठोक कापड व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सचिन चोपडा यांनी केले.
कापड व्यापारी संघातर्फे आयोजित कोजागरी पौर्णिमा स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर सारडा, मुकेश अरोरा, सचिन कटारिया, सचिन चोपडा, सचिन पेटकर, कपिल शहा, अजय गांधी, इंद्रकुमार मुथा, विजय गुगळे, विशाल शेठिया, सुशील फिरोदिया, दिलीप चोपडा, ओमप्रकाश इटारा, सचिन पितळे, रजनीकांत गांधी, जितेंद्र लड्डा आदी उपस्थित होते.
या प्रसंगी अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी संघाचे सदस्य संजय चोपडा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Marathi News Esakal
www.esakal.com