esakal | मुंबई- पुण्याच्या बळावर संजय झा पोचले होते दिल्लीमध्ये; कसे ते सविस्तर वाचा....

बोलून बातमी शोधा

Sanjay Jha reached Delhi on the strength of Pune and Mumbai

राजस्थानमधील राजकीय घडामोडींमध्ये सचिन पायलट यांची तळी उचलून धरल्याबद्दल कॉंग्रेसने निलंबित केलेले राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांचे मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळेच त्यांच्या निलंबनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतानाच हे तर होणारच होते, अशीच प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मुंबई- पुण्याच्या बळावर संजय झा पोचले होते दिल्लीमध्ये; कसे ते सविस्तर वाचा....
sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : राजस्थानमधील राजकीय घडामोडींमध्ये सचिन पायलट यांची तळी उचलून धरल्याबद्दल कॉंग्रेसने निलंबित केलेले राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांचे मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळेच त्यांच्या निलंबनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतानाच हे तर होणारच होते, अशीच प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील वर्तुळातून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मूळचे मुंबईचे असलेले झा यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले आहे. पुणे परिसरातील एका उद्योग समूहाचे ते जावई आहेत. त्यामुळे त्यांचा पुणे परिसरातही वारंवार वावर असे. झा हे व्यवसायाने कॉर्पोरेट ट्रेनर. तत्पूर्वी क्रिकेटशी संबंधित एक डॉट कॉम कंपनीही त्यांनी स्थापन केली होती. ही कंपनी स्थिरावल्यावर त्यांनी चांगल्या रकमेला विकून टाकली. मुंबई- पुण्यासह देशाच्या प्रमुख शहरांतील कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांचे चांगले नेटवर्क आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांचे वक्तृत्त्वही उत्तम आहे.
--------------
राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू
--------------
चीन-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका
--------------

मुंबईतील कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असताना, झा यांच्याबद्दलची ख्याती कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचली.  त्याचवेळी ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रियांका चर्तुर्वेदी यांचेही नाव गांधी यांच्यापर्यंत पोचले. टिम राहुलने त्याची खातरजमा केली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून त्यांनी 2012 मध्ये पश्चिम भारतासाठी महाराष्ट्रातून तीन प्रवक्ते निवडले. त्यात झा, चर्तुवेदी आणि अनंत गाडगीळ यांचा समावेश होता. पश्चिम भारतात राष्ट्रीय स्तरावर त्यांनी पक्षाची भूमिका मांडायची, अशी त्यांच्यावर जबाबदारी होती. पुढे या पॅनेलमध्ये रितेश देशमुख, प्रणिती शिंदे यांचाही समावेश झाला होता. राहुल गांधी यांनीच खुद्द जबाबदारी दिल्यामुळे झा यांचे महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये वजन वाढले. कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांचे नेटवर्क राज्यातील नेत्यांच्या डोळ्यात भरू  लागले. त्यातूनच त्यांच्याकडे प्रोफेशनल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. झा यांचा आलेख चढता राहिला आणि पक्षाच्या हायकमांडपर्यंत ते पोचले. त्यामुळेच राष्ट्रीय प्रवक्तेपदही त्यांच्याकडे आपसूकच आले. परंतु, अलिकडील काळात काही नेत्यांना काही नेत्यांना राष्ट्रीय  प्रवक्तेपदी अधिक संधी दिली. त्यामुळे झा नाराज झाले होते. 

या नाराजीतूनच त्यांनी सचिन पायलट यांची बाजू लावून धरली, अशी कॉंग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. 'सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री करावे', 'अशोक गेहलोत 3 वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री होते. आता त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात यावी', 'सचिन पायलट यांनी 2013- 18 या काळात पक्षाच्या विधानसभेतील जागा 21 वरून 100 पर्यंत नेल्या, त्याचे त्यांना हेच फळ का ?', 'ज्योर्तिराजे शिंदे, सचिन पायलट आता पुढे कोण ?' अशी ट्विट झा यांनी मंगळवारी सातत्याने केली. त्यांना नेटिझन्सकडून प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळेच हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे संजय झा यांना पक्षातून निलंबित केल्याचे एका पत्राद्वारे मंगळवारी रात्री जाहीर करावे लागले. 

झा यांना निलंबित करण्यात आले आहे, बडतर्फ नाही, याकडेही एका नेत्याने लक्ष वेधले. झा यांनी माफी मागून चूक सुधारली तर, त्यांचे पुनरूज्जीवन होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, झा आता राज्यातील एका युवा नेत्याला पाठबळ देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.