"कोरोना रोखण्यासाठी भवानी पेठेसारखी कार्यवाही संपूर्ण शहरात करावी"

CM.jpg
CM.jpg

कॅन्टोन्मेंट : काही दिवसापुर्वीपर्यत भवानी पेठ परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली होती. या ठिकाणी पोलीस अधिकार्‍यांनी दक्षता घेऊन पत्रे लाऊन सर्व परिसर वेळीच सील केला. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात आली आहे. या प्रकारे संपूर्ण शहरात कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद झाला. यावेळी पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजे आणि सद्याची परिस्थती यासंदर्भात माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचा प्रसार झापाटयाने होत आहे. यावर लस कधी निघेल याबाबत साशंकता आहे, त्यामुहे काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे. उत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये, यासाठी शिवसैनिकांनी काम करावे. यासाठी सर्वपक्षाचे आणि सर्व धर्माचे लोक एकत्र करुन कारोना दक्षता समिती नेमण्याचा माझा विचार आहे. अशा प्रकारची समिती सद्या जिल्हा आणि तालुका पातळीवर आहे. हि समिती गावाच्या पातळीपर्यत नेली तर सद्या ग्रामीण भागामध्ये झपाटयाने होणारा प्रार्दुभाव रोखता येईल. 

संजय मोरे म्हणाले, ''महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे पुण्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयश आले आहे. क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना सुविधा मिळत नाही. शिवभोजन थाळी पाच रुपयांना मिळत असताना महापालिकेने यापेक्षा निकृष्ट दर्जाची भ्रष्टाचारी थाळी ७० रुपयांना दिली जात आहे. राज्य शासनाच्या ससून रूग्णालयामधे कोरोना रूग्णांना सकाळी फळं,अंडी, नाष्टा, दोन वेळेस जीवनसत्वयुक्त जेवण, रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी क जीवनसत्वयुक्त गोळया एवढी काळजी घेतली जाते.'' पुणे महापालिका कोरोना रूग्णांना अशा चांगल्या सुविधा का देऊ शकत नाही.

ते पुढे असे म्हणाले, खाजगी हाॅस्पिटलच्या मनमानी कारभारामुळे रूग्णांना व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ईलाज कमी पण बिल भरमसाठ असा कारभार चालू आहे. खाजगी हाॅस्पिटलच्या ट्रस्टींनी पुणे मनपाकडून 99 वर्षाच्या करारावर अत्यंत अल्प दरात जागा ताब्यात घेऊन हाॅस्पिटल्स उभारले आहेत. सेवा म्हणून नव्हे तर एक व्यावसायिक धोरण राबवत आहेत. यावर पुणे मनपाचा कसलाही अंकुश नाही. पुणे मनपा व राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रूग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा अनेक विषयांवर चर्चा पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com