esakal | संजय भाऊ सॉरी; खरंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पिंपरीत लागलेत बॅनर?
sakal

बोलून बातमी शोधा

Hording

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना,‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संजय भाऊ सॉरी; खरंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पिंपरीत लागलेत बॅनर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला असल्याच्या बातम्या काही स्थानिक न्यूज पोर्टलवर झळकल्या असल्यातरी हा फोटो एडिट केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. हा फोटो सोशल मीेडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या फलकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभेचा निकाल लागून 12 दिवस उलटले. तरी, देखील भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापनेचा घोळ सुरुच आहे. भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. नेमका आज दिवसभर हा एडिट केलेला फोटो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रासह होर्डिग्ज असलेला हा फोटो आहे.