कोपरगाव ः- संजीवनीच्या पस्तीस विद्यार्थ्यांना नोकरीची संधी....

कोपरगाव ः- संजीवनीच्या पस्तीस विद्यार्थ्यांना नोकरीची संधी....
Published on

SHD26B05252
कोपरगाव ः संजीवनी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना सुंगवू हायटेकमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य ए.आर. मिरीकर यावेळी उपस्थित होते.
-------------------
‘संजीवनी’च्या ३५ विद्यार्थ्यांना नोकरी
ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचा पुढाकार : सुंगवू हायटेकमध्ये संधी

कोपरगाव, ता. १८ : संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी सुंगवू हायटेक कंपनीत नोकरीची संधी मिळाली. दक्षिण कोरियाची ही कंपनी ऑटोमोबाईल घटक निर्मिती क्षेत्रात कार्यरत असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन पॅकेज देण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर उपस्थित होते. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाली. उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती आणि कौशल्यविकास उपक्रमांचे फलित असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेवर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत असून, प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी, उद्योग किंवा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

नोकरीची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय कैटाके, कार्तिक वर्खडे, आदित्य पवार, अभिषेक रहाणे, चैतन्य देवकर, अभिषेक काळे, विकास मतसागर, आकाश जाधव, किरण त्रिभुवन, सिद्धार्थ वणे, सनी गायकवाड, समर्थ रहाणे, विशाल धनवटे, ऋतिक गव्हाणे, गौरव सोनवणे, आदित्य विश्‍वंभर, सार्थक सोनवणे, शिवराम शिरसाठ, विवेक वणे, श्रद्धा डेंगळे, अतुल खरड, कोमल दैने, नील पवार, प्रथमेश त्रिभुवन, साक्षी गुरसळ, ऐश्‍वर्या शिंदे, राजश्री बोठे, निकिता गांगुर्डे, विद्या जगताप, प्रियंका घोपाळ, बब्बी कुमार, सोनू कुमार, राजू प्रसाद, सनी कुमार आणि मोहम्मद सलाउद्दीन यांचा समावेश आहे.
-------------
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे. शिकून स्थिरस्थावर होऊन स्वावलंबी बनावे, ही माझ्या आई-वडिलांची प्रबळ इच्छा होती. संजीवनीमुळे ती पूर्ण झाली. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी उत्तम तयारी करून घेतली होती.
-आकाश जाधव, विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com