माउलींच्या पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

आषाढी वारीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. २) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल.
Sant Dnyaneshwar Maharaj
Sant Dnyaneshwar MaharajSakal

आळंदी - आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari) सरकारने (Government) ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. २) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) पंढरीकडे प्रस्थान होईल. या सोहळ्यासाठी आळंदीत (Alandi) येणाऱ्या वारकऱ्यांची बुधवारी (ता. ३०) आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करून फ्रुटवाले धर्मशाळेत राहण्याची सोय केली जाणार आहे. (Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan on Friday)

याबाबत पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी माहिती दिली की, मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार प्रस्थान सोहळ्यासाठी अल्प वारकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. प्रस्थानसाठी ज्या लोकांना परवानगी दिली जाईल, त्या दिंडीकऱ्यांनी देवस्थानकडे रविवारी (ता. २७) प्रतिनिधीचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर दिंड्यांच्या प्रतिनिधींची यादी पोलिसांकडे राहणार आहे. देवस्थानकडे नोंदणी केली नसेल; तर प्रस्थानसाठी प्रवेश दिला जाणार नाही. वारकरी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवस आधी (ता. ३० जून) आळंदीत येतील.

Sant Dnyaneshwar Maharaj
आमचं वय संपल्यावर राज्य लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षा घेणार काय?

प्रस्थान सोहळा कार्यक्रम (२ जुलै)

  • पहाटे साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत : समाधीवर पवमान पूजा आणि अभिषेक.

  • सकाळी नऊ वाजता : कीर्तन.

  • दुपारी अडीच वाजता : माउलींच्या समाधीवर पोशाख. वीणा मंडपात मानकऱ्यांना मानाचे पागोटे वाटप.

  • दुपारी तीन वाजता : वारकऱ्यांना पान दरवाजातून प्रस्थानसाठी प्रवेश.

  • दुपारी चार वाजता : माउलींच्या पादुकांचे प्रस्थान.

  • सायंकाळी सहा वाजता : सोहळा आजोळघरी मुक्काम आणि समाज आरती.

आषाढी वारी कार्यक्रम

  • २७ जून - दिंडीकऱ्यांनी देवस्थानकडे प्रतिनिधीचे नाव नोंदवणे आवश्यक

  • ३० जून - वारकऱ्यांना आळंदीत प्रवेश.

  • २ जुलै - प्रस्थान सोहळा.

  • ३ जुलै ते १९ जुलै - आजोळघरी माउलींच्या पादुकावर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार.

  • १९ जुलै - सकाळी दहाच्या दरम्यान पादुका आळंदीतून एसटीने पंढरीकडे मार्गस्थ.

  • १९ ते २४ ऑगस्ट - पादुकांचा मुक्काम पंढरीत.

  • २४ ऑगस्ट - पौर्णिमेला काला झाल्यानंतर माउलींच्या पादुका पुन्हा एसटीने माघारी निघणार.

प्रस्थानाच्या दिवशी संबंधित व्यक्तीला मंदिरात यादीनुसार प्रवेश दिला जाईल. प्रस्थानाचा कार्यक्रम सर्व निर्बंध पाळून पार पडेल. पोलिस आणि महसूल खात्यांचे लक्ष असल्याने सर्वांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करून यंदाचा प्रस्थान सोहळा आरोग्यदायी सुरळीत पार पाडायचे आहे.

- अॅड. विकास ढगे, पालखी सोहळा प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com