
पुणे : ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ असा भाव मनात ठेवून, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीसागर शुक्रवारी (ता. २०) पुण्यनगरीत दाखल होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.