Video : तुकोबांच्या पादुका देहूत परतल्या

मुकुंद परंडवाल
गुरुवार, 2 जुलै 2020

पंढरपूर येथील आषाढी वारीहून संत तुकाराम महाराजांच्या पादुका गुरुवारी (ता. 2) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देहूत एसटी बसने दाखल झाल्या.

देहू (पुणे) : पंढरपूर येथील आषाढी वारीहून संत तुकाराम महाराजांच्या पादुका गुरुवारी (ता. 2) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देहूत एसटी बसने दाखल झाल्या. देहू ग्रामस्थांच्या वतीने फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. रात्री नऊ वाजता देऊळवाड्यातील भजनी मंडपातील फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. संत तुकाराम महाराजांच्या विश्वस्तांच्या वतीने आरती करून तुकोबांच्या पादुका विसावल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी वारी रद्द करण्यात आली. केवळ तुकोबांच्या पादुका एसटी बसने आषाढी एकादशीच्या एक दिवसआधी पंढरपूरला नेण्यात आल्या. तसेच, दुसऱ्या दिवशी त्याच बसने या पादुका परत स्वगृही आणण्यात आल्या. गुरुवारी रात्री आठ वाजता पादुकांचे गावात आगमन झाले. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संस्थानच्या वतीने दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर बाजारपेठमार्गे पादुका इनामदारवाड्याजवळ आल्या. याठिकाणी सुजित मोरे यांच्या हस्ते पादुकांची आरती झाली. त्यानंतर देहूकरांच्या दिंडीने देऊळवाड्याच्या महाद्वारात पादुकांचे स्वागत केले. नऊ वाजता प्रदक्षिणा होऊन पादुका भजनी मंडपातील पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर सेवेकरी यांच्या सत्कार करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram maharaj paduka back to dehu from pandharpur