
देहू : ‘‘आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ aजूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. स्वच्छतेची कामे करण्यात येत असून, वारकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी नगर पंचायतीने अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले आहे,’’ अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.