

Devotion and Service Shine in Varvand as Sant Tukaram Maharaj Palkhi Makes Grand Entry
sakal
वरवंड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता. १३) लाखो वैष्णवांसह वरवंड (ता. दौंड) येथे उत्साहात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, तर ‘ज्ञानोबा-तुकारामां’च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.