
देहू : आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या बुधवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.