सरस्वती पूजनातून एकोपा, परंपरेप्रती आदराचे दर्शन

सरस्वती पूजनातून एकोपा, परंपरेप्रती आदराचे दर्शन
Published on

पिंपळे गुरव, ता. ३० : पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या बंगाली समाज बांधवांकडून वसंत पंचमीच्या पावन पर्वावर सरस्वती पूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवी सांगवी परिसरात यातून सामाजिक आणि सांस्कृतिक एकता दिसून आली.
‘नेताजी क्लब’च्या माध्यमातून बंगाली समाज दरवर्षी वसंत पंचमीनिमित्त या पूजेचे आयोजन करतो. ज्ञान, विद्या, संगीत व कलेची अधिष्ठात्री देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती, सुसंवाद, एकोपा व सातत्यपूर्ण प्रगती व्हावी, अशी सामुदायिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
या पारंपरिक पूजेवेळी बंगाली प्रथेप्रमाणे देवी सरस्वतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. समितीचे सर्व सदस्य व नागरिकांनी श्रद्धा व निष्ठेने सहभाग घेतला. या निमित्ताने समाजातील सांस्कृतिक परंपरा जपल्या गेल्या असून शिस्त, एकोपा आणि परंपरेप्रती आदराचे दर्शन घडले. याप्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, ‘‘सरस्वती पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती ज्ञान, विद्या, संगीत आणि कलेचे प्रतीक आहे. तसेच वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. अशा उत्सवांमुळे समाजात सकारात्मक विचार आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागते.’’
कार्यक्रमास सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोत नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तौफिक सय्यद, रमेश चौधरी, सचिन खराडे, शैलेश जाधव, बच्चू माल, सोमनाथ माल, पलाश माल, पिंटू पात्रा, सुबीर पात्रा, विश्वजित माझी, दुलाल दास, बिभूती बेरा, हेमंत आश, अजय दळवी, मिथुन दास, बिरबल तुरे, कौशिक करार, मिठू माल, श्रावंती माल, झुमा माल, दुर्गा पात्रा, शिप्रा पात्रा, शिप्रा दास, संपा माझी, पंपा बेरा, झुंपा आश, शिवानी दळवी, सुभो पात्रा, बिनिता माल, पियुष माल, पुनीत पात्रा, प्रिन्स करार यांच्यासह बंगाली समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com